लाखो रूपये खर्च करून देखील पोथरे,निलज,संगोबा ग्रामस्थ फिल्टर पाण्यापासून वंचित

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पोथरे निलज ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाणी फिल्टरचे मशीन बसवण्यात आले. परंतु गेल्या सात महिन्यापासून संगोबा,निलज पोथरे येथील आरओ फिल्टर टोकन टाकून देखील अर्धा लिटर सुद्धा पाणी येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
तीर्थक्षेत्र संगोबा या ठिकाणी अनेक जिल्ह्यांतून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. संगोबा तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी दहावा- तेरावा देखील मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागते. संबंधित आरओ फिल्टरची मिशनरी देखील निकृष्ट दर्जाची आहेत. पोथरे जिल्हा परिषद शाळा, पोथरे एस टी स्टँड परीसरातील आरो फिल्टर मशीन बसवले परंतु या ठिकाणी सुद्धा गेल्या सात महिन्यापासून पाणी मिळत नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
संगोबा,निलज पोथरे याठिकाणी आर.ओ. मशीन बसविणाच्या ठेकेदाराने मोठा भ्रष्टाचार केलेला असून याची लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच आठ दिवसांच्या आत आरओ पाणी फिल्टर संगोबा, पोथरे येथे चालू न झाल्यास गटविकास अधिकाऱ्यांस पाण्यानें अंघोळ घालणार आहोत.
– अंगद देवकते, जिल्हा सरचिटणीस,राष्ट्रीय समाज पक्ष



