आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून ‘प्रगती पवार’ हिचा सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे विजयराव पवार व सौ. वंदना पवार यांची कन्या प्रगती पवार हिने शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश मिळवले असून, तिची मास्टर ऑफ सायन्स इंजिनियरींग मॅनेजमेंटसाठी अमेरिकेत असलेल्या युनिर्व्हसिटी ऑफ सर्दन कॉलिफोर्निया लॉस एंजल्स् येथे निवड झाली असून, लवकरच ती अमेरिकेला जाणार आहे. तिच्या या निवडीबद्दल तालुक्यातील अनेक मान्यवरांनी व संस्था प्रतिनिधींनी तिचे अभिनंदन केले आहे.
आज (ता.15) करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व प्रगती हिचा सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवदादा माळी, मकाईचे माजी संचालक विवेक येवले, माजी नगरसेवक संजय सावंत, विजयराव पवार, मनोज पवार आदी उपस्थित होते. यावेळी पवार बंधूंनी त्यांचे स्वागत केले.तसेच आमदार संजयमामा यांनी प्रगती हिच्या कडून तिच्या शिक्षणाविषयी जाणून घेतले, याप्रसंगी आम.शिंदे यांनी पवार कुटुंबियांसोबत भोजनाचा आस्वादही घेतला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.


