कोरोनापूर्वीची करमाळा-टेंभुर्णी (केम मार्गे) एसटी पूर्ववत करावी -

कोरोनापूर्वीची करमाळा-टेंभुर्णी (केम मार्गे) एसटी पूर्ववत करावी

0

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : कोरोना आधी सुरू असलेली करमाळा टेंभुर्णी (केम मार्गे) एसटी लॉक डाऊन उठल्यानंतर चालूच झाली नसल्याने प्रवाशांना प्रवास करणे गैरसोयीचे ठरत आहे. ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी या मार्गावरील गावातील नागरिकांकडून होत आहे.

कोरोना कालावधी आधी ही गाडी करमाळा येथून साडे अकरा वाजता सुटत होती. सदर गाडी पांडे, शेलगाव, साडे, घोटी केम,ऊपळवाटे दहिवली, कन्हेरगाव मार्गे टेंभुर्णीला दुपारी अडीच वाजता पोहचत होती. काही वेळातच हीच गाडी याच मार्गाने करमाळ्याला परत जायची. या गाडी मुळे शेलगाव,साडे, घोटी, केम येथील प्रवाशांना टेंभुर्णीला जायचे सोयीची होते व जवळचा मार्ग असल्याने तिकिट भाडे कमी लागत होते.

कोरोना लॉकडाऊन संपल्यावर अनेक गाडया सुरू झाल्या पण ही गाडी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी ही गाडी सुरू करून पूर्वीच्या मार्गात बदल करून ही गाडी केम वडशिवणे,कंदर मार्गे टेंभुर्णी अशी सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. विशेष म्हणजे सध्या केम कंदर, टेंभुर्णी मार्गावर एकही एसटी नाही. त्यामुळे प्रवाशांना खाजगी गाडयाचा आसरा घ्यावा लागत आहे. या गाडयाची दोन ते तीन तास पर्यंत वाट पाहत बसावे लागत आहे. पुण्याहून येणारा प्रवासी टेंभुर्णी कंदर येथे तीन ते चार तासात येतो. पण कंदर येथून केमला येयचे म्हटले तर तीन ते चार तास खाजगी गाड्या ची वाट पाहत बसावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे केमला गाडया नसल्याने केमला येणाऱ्या लोकांची गैरसोय होते.

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कोरोना काळापासून बंद असलेली करमाळा टेंभूर्णी बस पांडे,शेलगाव,साडे,घोटी केम मागै टेंभुर्णी अशी सुरू करण्यात येइल

अश्विनी किरगत, करमाळा आगारप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!