अंजनडोह येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा - Saptahik Sandesh

अंजनडोह येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अंजनडोह येथे उद्योजक सोपानराव राख यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.


करमाळा (संदेश प्रतिनिधी) – अंजनडोह येथे काल ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात पार पडला. ध्वजारोहणासाठी पुणे येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सोपानराव राख यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच सौ. पल्लवी शेळके व उपसरपंच सौ. पन्हाळकर यांनी ध्वजारोहण केले.

येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अंजनडोह गावातील नागरीकांनी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी माजी सरपंच श्री अरुण आण्णा शेळके, श्री शहाजीबापू  माने, श्री बलदोट काका, श्री परदेशी, हभप मुळे महाराज , डॉ श्री शेळके व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरीक, माता पालक उपस्थित होत्या

याप्रसंगी शाळेला सतत पाच वर्षे सर्व मुलांना वह्या , पॅड व खाऊ  शैक्षणिक साहित्याची मदत करणारे वंजारवाडी गावचे सुपुत्र व सुप्रसिद्ध उद्योजक  श्री सोपानराव राख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचा यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांची जोशपूर्ण भाषणे झाली.

शाळेला नवीन स्टेज बांधण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी २६ हजार रुपयांची भरघोस लोकवर्गणी जमा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक श्री.गुटाळ यांनी केले . आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री मोहोळकर यांनी केले. खाऊवाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!