पोलीस असल्याचा बहाणा करून मारहाण करून १९ हजार रूपये लुटले.. - Saptahik Sandesh

पोलीस असल्याचा बहाणा करून मारहाण करून १९ हजार रूपये लुटले..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता.१६ : पोलीस असल्याचा बहाणा करून चौघांनी एकास मारहाण करून १९ हजार ५०० रूपये लुटले व पोलीसात तक्रार दिलीतर गाडी अंगावर घालून जीवे मारू अशी धमकी दिली. हा प्रकार ११ जून रोजी सकाळी १० वाजता केम येथे घडला आहे.

याकामी १५ जुन ला गुन्हा दाखल झाला आहे. यात राहुल जगन्नाथ नकाते रा.केम यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की मी कापड व्यापार करतो. त्यातून माझी चौफाळा, ता. बीड येथील मनोज बावरकर यांची ओळख झाली होती. ११ जुन ला सकाळी १० वाजता मी बसवेश्वराच्या मंदिरात गेलो असताना तेथे मनोज बावरकर, तसेच नातेवाईक आनंद निनाळे व दोन अनोळखी लोक तोंडाला रूमाल बांधून आले. त्या अनोळखी रेल्वे पुलाकडे लोकांनी माझ्या मानेला व पाठीमागून धरले व चल आम्ही पोलीस आहोत, असे म्हणून आणले.

मी त्यांना तुमचे ओळखपत्र दाखवा असे म्हणालो असता, त्यांनी ओळखपत्र पाहिजे का? असे म्हणून जबरदस्तीने स्कॉर्पियो गाडीत बसवून त्यांनी मला मारहाण करून माझ्या जवळील १९५००/- रूपये काढून घेतले घेऊन जावू लागले होते. मी मोठ्याने ओरडलो तेंव्हा रस्त्यावरील लोक आल्यावर सोडले पण तू जर पोलीसात फिर्याद दिलीतर तुझ्या अंगावर गाडी घालून जीवे मारू अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!