केम येथे किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील जाणता राजा स्पोर्ट क्लब व धर्मवीर संभाजी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिपावली निमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ काल शनिवारी (दि २५ नोव्हेंबर) रोजी संपन्न झाला.
या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये एकूण १५ मुलींना बक्षीस देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले. बक्षीसाचे निकष ठरविण्यात आले होते त्यामध्ये किल्ला बांधणीमध्ये काय दर्शविते, मावळे ठेवण, किल्याचा देखावा, किल्ल्याचे आकारमान आदी निकष लावले होते.
परिक्षक म्हणून ओंकार जाधव व रोहित तळेकर यांनी काम पाहिले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन किल्याची पाहणी करून त्याचे फोटो काढले. मार्गदर्शक अक्षय तळेकर व प्रमोद धनवे यांनी चार नंबर काढले. या मध्ये प्रथम बक्षीस विभागून कुमार अथर्व प्रदिप गुळवे व विरेण तळेकर यांना देण्यात आले. व्दितीय क्रमांक आयर्न तळेकर, तृतीय क्रमांक विभागून विश्वजित चव्हाण व प्रथमेश तळेकर, चतुर्थ क्रमांक विभागून साक्षी तळेकर व यशराज खरवडे यांना देण्यात आले.
बक्षीसाचे स्वरूप प्रशस्ती पत्रक व बक्षीस रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना अक्षय तळेकर यांनी केली या सत्कार समारंभ प्रसंगी नागनाथ तळेकर म्हणाले कि हि स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना स्वराज्य, किल्ले, इतिहासाची माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांना स्वराज्य विषयी व किल्ले जतन करण्यासाठी वातावरण निर्माण होईल
तर गुळवे सर म्हणाले स्वराज्यचा एक दगड आपल्या किल्याला लागला याचे आपले सार्थक झाले. त्यांनी या मंडळाचे कौतुक केले. पुढच्या वर्षी हि स्पर्धा मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे या साठी माझे सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले .
या वेळी युवा नेते अजित दादा तळेकर,शिवसेनेचे श्री,हरि तळेकर सतीश खानट आवीनाश तळेकर,उत्तरेश्वर गोडगे, अनिल गोडगे, पत्रकार संजय जाधव जालिंदर तळेकर गणपत कांबळे, राजेंद्र तळेकर, नितीन तळेकर दयानंद तळेकर आर एन तळेकर शिवाजी तळेकर शिवम कोरे, राहुल कोरे गोडगे सर शंभु तळेकर चेतन साखरे राजेश तळेकर आदि उपस्थित होते.