पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून प्रा. अभिमन्यू माने यांना पीच.डी.पदवी प्रदान.. - Saptahik Sandesh

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून प्रा. अभिमन्यू माने यांना पीच.डी.पदवी प्रदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने 3 जुलै 2024 रोजी प्रा.अभिमन्यू माने यांना ‘Linguistic Study of Kaikadi Language in Solapur District’ या संशोधन विषयावर पीच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.

संशोधनाच्या मौखिक परीक्षणासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. शिवाजी सरगर, अध्यक्ष म्हणून डॉ. ॲनी जॉन आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ तानाजी कोळेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासराव घुमरे, अध्यक्ष मा‌. मिलींद फंड, प्राचार्य डॉ एल.बी. पाटील,कविवर्य सुरेश शिंदे,उपप्राचार्य डॉ अनिल साळुंखे आणि कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक तसेच वरिष्ठ कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी प्रा. अभिमन्यू माने यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.

सत्कार समारंभावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव मा.विलासरावजी घुमरे सर यांनी सर्व प्राध्यापकांनी डॉ. ए.पी.माने यांचा आदर्श घ्यावा व आपली शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करावी असे मत व्यक्त केले. याप्रसंगी कविवर्य डॉ. सुरेश शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल बी पाटील यांनी आपल्या मनोगतातून डॉ. ए.पी. माने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संशोधक प्रा. अभिमन्यू माने यांचे सेटो, इंग्रजी शिक्षक संघटना आणि सुटा या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संघटनांच्या सदस्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!