अंध व्यक्तीची मार्गदर्शकाची भूमिका आपल्या जीवनात एक नवीन दिशा पुरस्कार देणारी – प्रा.डाॅ. सचिन मोरे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अंध लोकांसाठी केलेले कार्य जीवनात ध्येयपूर्ती करणारी व खऱ्या अर्थाने जीवनाला एक वेगळे वळण देणारी ठरली आहे, असे मत प्राध्यापक सचिन मोरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. मन्वंतर सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक डाॅ.सचिन मोरे यांचा सत्कार नंदन प्रतिष्ठान करमाळा यांच्यावतीने अध्यक्ष जितेश कटारिया तसेच प्रकाश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा.डॉ.विजय कदम या पार्शली ब्लाईंड मित्राला वाचून दाखवताना अंधांसाठी काम करण्याची दिशा मिळाली. डॉ. विजय कदम आज अहमदनगर महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. यावेळी पुढे बोलताना मोरे म्हणाले की, परमेश्वराने आपल्याला सर्व अवयवांनी संपन्न केले असतानाही न्यूड गंडाच्या भावनेतून माणूस आपले स्वरूप विसरतो व चुकीच्या मार्गाने जाऊन भरकटून आपले करियर उध्वस्त करतो, मला पुरस्कार मिळाला त्याचे सर्व श्रेय मी या अंध लोकांच्या कार्याला देतो, कारण ज्या 35 लोकांना मी मार्गदर्शक म्हणून काम केले ते सर्व लोक विविध क्षेत्रांमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहून सुखी संपन्न आयुष्य जगत आहेत.
अभिनय क्षेत्रामध्ये मला काम करण्याची इच्छा असल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ख्वाडा या चित्रपटांमध्ये पाटील यांची भूमिका करून अभिनय क्षेत्रातही स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे समाजाची काहीतरी देणे लागतो या भावनेतून करमाळ्यासाठी भविष्यामध्ये काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमास भाजपाचे माजी शहराध्यक्ष जितेश कटारिया प्रकाश क्षीरसागर भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शाम सिंधी पत्रकार नरेंद्रसिंह ठाकुर दिनेश मडके,इंजिनीयर निलेश माने गणेश वाशिंबेकर संजय जमदाडे पिंटू भुसारे आदी मान्यवर उपस्थित होते.