प्रा. डॉ. तानाजी जाधव यांची मिरजगाव येथील महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी निवड -

प्रा. डॉ. तानाजी जाधव यांची मिरजगाव येथील महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी निवड

0
प्रा. डॉ. तानाजी जाधव

करमाळा (दि. ३०):भालेवाडी, (ता. करमाळा ) या गावचे सुपुत्र प्रा. डॉ. तानाजी हनुमंत जाधव यांची मिरजगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी  निवड करण्यात आली आहे. शिक्षण, संशोधन व सामाजिक कार्यातील त्यांचा दीर्घ  अनुभव लक्षात घेता ही निवड करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. जाधव हे २००८ पासून या महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण २५ शोधनिबंध प्रकाशित केले असून ५३ शैक्षणिक सेमिनार व परिषदांमध्ये सहभाग घेतला असून, १८ ठिकाणी शोधनिबंध वाचन केले आहे. याशिवाय ४५ ठिकाणी विषय तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करून शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले आहे.

सामाजिक भान जपत त्यांनी ग्रामस्वच्छता अभियान, जलसंधारण, महिला सबलीकरण, मतदान व एड्स जनजागृती, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता व संवर्धन, मूल्यशिक्षण कार्यशाळा, हागणदारीमुक्त गाव अभियान, वृक्षारोपण, आरोग्य व रक्तदान शिबिरे, तसेच पाणी फाउंडेशनचे विशेष शिबिर असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल करंजे-भालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!