यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील यांना क्रांतीसूर्य सत्यशोधक समता पुरस्कार प्रदान.. -

यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील यांना क्रांतीसूर्य सत्यशोधक समता पुरस्कार प्रदान..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती महोत्सव रावगाव (ता.करमाळा) येथे विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठान रावगाव तर्फे देण्यात येणारा क्रांतीसूर्य सत्यशोधक समता पुरस्कार जेष्ठ समाजसेवक आणि यशकल्याणी समाजसेवी संस्थेचे संस्थापक प्रा.गणेश करे पाटील यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रा.करे-पाटील यांनी बोलताना आपले विचार व्यक्त केले कि, महात्मा फुले यांनी समाजाला दिलेल सामाजिक, शैक्षणिक,आणि औद्योगिक शेती या क्षेत्रात दिलेले योगदान आजही उपयुक्त ठरत आहे. महापुरुषांना एका जातीत न बांधता त्यांचे विचार समस्त देशाच्या विकासाच्या विचाराचे व्यासपीठ झाले पाहिजे. महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन शैक्षणिक क्षेत्रात काम करत असुन त्यांचे नावे पुरस्कार मिळणे हे माझ भाग्य समजतो. असेही त्यांनी म्हटले आहे.


याप्रसंगी पंचक्रोशीतील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संध्याकाळी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे संगीतमय मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान ही श्री.करे-पाटील यांच्या हस्ते आला. याप्रसंगी शनी भुजबळ, सागर रासकर, भाऊ मेहेर, अनिकेत रासकर, मा. सरपंच गोवर्धन करूळ , सुभाष पवार, विलास बरडे, गणपत बुधवंत गुरुजी, कानडे गुरूजी,रोहित रासकर,गुरूजी, अनिल साळुंखे गुरूजी, अशोक भुजबळ, महेश भुजबळ, बिभीषण रासकर, दादा रासकर,
जय भुजबळ, कैलास काळे, लक्ष्मण रासकर, विकास नाईकनवरे, कृष्णा नाईकनवरे, शिवराज नाईकनवरे, नागेश रासकर, आदी समता सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!