प्रा. गणेश रंदवे यांचे M-SET परीक्षेत यश

करमाळा(दि.३): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने असिस्टंट प्रोफेसर पदासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (M-SET) घेण्यात आली होती. या परीक्षेत पोथरे(ता. करमाळा) येथील प्रा.गणेश रामकृष्ण रंदवे यांनी उत्तीर्ण होत यश मिळवले आहे. गणितीय शास्त्र या विषयासाठी रंदवे यांनी ही परीक्षा दिली होती.

प्रा. रंदवे सध्या पुण्यातील एमआयटी विद्यापीठात अनुप्रयुक्त गणित या विषयात पीएच.डी. संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी ॲमिटी विद्यापीठ, मुंबई येथे प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले आहे. M-SET परीक्षेतील यशानंतर त्यांना विविध विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा करण्याच्या संधी निर्माण होणार आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण पोथरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ग्रामीण भागातून शिक्षण घेत पुढे जाऊन त्यांनी मिळवलेले हे यश हे इतरांना प्रेरणादायी असून या यशाबद्दल त्यांचे पोथरे परिसरातून अभिनंदन केले जातं आहे.




