प्रा.महेश निकत ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल’ यांच्या ‘राष्ट्ररत्न’ पुरस्काराने सन्मानित…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक प्रा महेश निकत यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल निती आयोग भारत सरकार संलग्न व आयएसओ मानांकन असलेल्या मनिभाई मानवसेवा ट्रस्ट पुणे यांच्या तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा “राष्ट्ररत्न पुरस्कार 2023” देण्यात आला.
यावर्षी क्रीडा, कला,सामजिक, शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना याठिकाणी सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रा निकत यांनी करमाळा सारख्या शहरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मागील 3 वर्षात केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यतीन ढाके (मुख्य संपादक दै.जनशक्ती), सतीश गवळी (सेक्रेटरी , विद्या प्रसरणी मंडळ पुणे), विद्याधर गायकवाड (जी एस टी असि. कमिशनर पुणे), पोपटराव भोळे (प्रदेशाध्यक्ष किसन मोर्चा भाजप), राजेंद्र लकेश्री (जेष्ठ पत्रकार मुंबई), असे अनेक मान्यवर होते.
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिन याचे औचित्य साधून 31 ऑक्टोंबर 2023 रोजी हा पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे याठिकाणी देण्यात आला.
या पुरस्कार मुळे पुढील काळात आणखी जास्त ऊर्जेने कार्य करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असे प्रा निकत यांनी यावेळी सांगितले.