करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाला 'आदर्श संगीत विद्यालय' पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाला ‘आदर्श संगीत विद्यालय’ पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.२) –  करमाळा येथील लोकनेते स्व. दिगंबरराव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा यांच्यावतीने आदर्श संगीत विद्यालय पुरस्कार २०२४ या पुरस्कारासाठी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाची निवड करण्यात आली.  विद्यालयाचे संस्थापक-प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री सतीश कांबळे म्हणाले की करमाळ्यातील सुरताल संगीत विद्यालय हे गेली 27 वर्षा पासून कार्यरत आहे. विद्यालयाचा दर्जा हा खूपच चढता असून आयएसओ मानांकन असलेले संगीत विद्यालय आहे. सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्याची ही या विद्यालयाला मान्यता असून तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना संगीत विषयाच्या गुणासाठी या विद्यालयाचा खूपच मोठा फायदा होत आहे. आज राज्यभर सुर ताल संगीत विद्यालयाचे नाव झालेले आहे. यामध्ये प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचे तालुक्यासाठी फार मोठे योगदान आहे आहे. म्हणूनच लोकनेते स्वर्गवासी दिगंबरराव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था करमाळा यांच्यावतीने देण्यात येणारा आदर्श संगीत विद्यालय पुरस्कार हा प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना देण्यात आला आहे असे ते म्हणाले.

यावेळी वाय चेअरमन श्री विकास काळे सचिव श्री संतोष पोतदार संचालक अशोक बर्डे, बाळासाहेब देशमाने, व शिक्षक शिक्षिका वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. योग शिक्षिका रेश्मा जाधव, संध्या थोरे, थोरे सर, प्रदीप नलावडे, शिवलिंग कराळे एडवोकेट सुनील जोशी साहेब, महेश थोरे, विलास भोरे, सुहास कांबळे, बाळासाहेब महाजन, सतीश वीर, नवनाथ थोरात इतर मान्यवरांच्या हस्तेही यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!