मकाईच्या ऊस बिलासाठी आमरण उपोषण करणार- प्रा. राजेश गायकवाड - Saptahik Sandesh

मकाईच्या ऊस बिलासाठी आमरण उपोषण करणार- प्रा. राजेश गायकवाड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या ऊस गळीत हंगामाची बिले अद्याप दिलेली नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत मकाई कारखान्याने ऊस बिले शेतकऱ्यांना दिली नाही तर ३१ ऑक्टोबरला संगोबा येथील आदिनाथ मंदिरात मी आमरण उपोषण सुरु करणार आहे, अशी माहिती करमाळा तालुक्यातील प्रा. राजेश गायकवाड यांनी माध्यमांना दिली.

या विषयी अधिक माहिती देताना, प्रा.गायकवाड म्हणाले की, मागील हंगामात मकाईने ऊस नेऊन दहा ते अकरा महिने झाले आहेत. पण मकाईने शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नाही. शेतकऱ्यांचे महत्वाचे सण पोळा, गणेशोत्सव, दसरा असे कितीतरी सण आले आणि गेले आता दिवाळीचा सण तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे अजून मिळत नसतील तर अमरण उपोषण हाच पर्याय आहे. कारखान्याचे एम. डी., जबाबदार अधिकारी फोन उचलत नाहीत.

या संदर्भात आज (दि.२४) राजेश गायकवाड यांनी करमाळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, येत्या तीस ऑक्टोबरपर्यंत जर ही बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत तर आपण श्री आदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे ३१ ऑक्टोबर २०२३ पासून आमरण उपोषण करणार असून माझ्या उपोषणा दरम्यान माझे काही बरे वाईट झाल्यास त्यास संपूर्ण मकाई चे तत्कालीन अध्यक्ष,संचालक मंडळ हे जबाबदार असणार आहेत. यावेळी बहुजन आघाडी चे राजाभाऊ कदम, व ग्रामस्थ उपस्थित होते.

ऊस उत्पादक संतप्त ! – कारखान्यांनी तात्काळ बिले द्यावीत – अन्यथा शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!