मकाई प्रशासन मंडळावर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन - प्रा. रामदास झोळ - Saptahik Sandesh

मकाई प्रशासन मंडळावर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन – प्रा. रामदास झोळ

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल ३ जानेवारीपर्यंत न दिल्यास मकाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले असल्याची माहिती प्रा. रामदास झोळ यांनी प्रसार माध्यमांना दिली. मकाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 थकीत ऊस बिल न मिळाल्यामुळे शेतकरी प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.

यावेळी प्रा. रामदास झोळ यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ कांबळे, ॲड राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, प्राध्यापक राजेश गायकवाड, हरिदास मोरे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने अजिनाथ चे माजी संचालक विठठल शिंदे, माधव नलवडे आदीजन होते.

यावेळी आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समोर आपले म्हणणे मांडताना सांगितले की, थकीत ऊस बिल मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी कारखाना प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला, तरी सुद्धा आमची दखल कुणी घेतली नाही म्हणून आम्ही सुरुवातीला बोंबाबोंब आंदोलन आमरण उपोषण त्यानंतर थु थु आंदोलन केले तरी मकाई सहकारी साखर कारखान्याची चेअरमन कार्यकारी संचालक यांनी फक्त आम्हाला आश्वासन देत चालढकल करण्याची काम केले प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे होते संबंधित तहसीलदार तसेच सरकारी यंत्रणेनेही आमच्या मागणीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही म्हणून आमच्यावर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचण्यासाठी आम्ही आपणास भेटायला आले असून ऊस बिल न मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या दैनंदिन गरजाही भागवणे कठीण बनणे आहे. अनेकांनी सावकारी कर्ज काढले असून त्या सावकाराची कर्ज फेडण्यासाठी आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे अनेक मुला मुलींचे लग्न शिक्षण पैसे अभावी रखडले आहे अशा परिस्थितीत आम्हाला आता पैसे मिळाले नाही तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही आपण एक जबाबदार अधिकारी आहात आमच्या भावना समजून घेऊन आम्हाला न्याय देतात या भावनेतून आम्ही आपणाकडे आलो आहोत तरी आपण आमच्या ऊस बिल मागणीची दखल घेऊन याबाबत काही सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक यांच्यावर कारवाई करून आम्हाला ऊस बिल मिळून देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली असून मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबत संबंधित संचालक मंडळ व प्रशासन यांची आपण तीन जानेवारीला मीटिंग ठेवली असून त्याआधी त्यांनी ऊस बिल देणे अपेक्षित आहे त्यांनी जर ऊस बिल न दिल्यास आपण मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन, संचालक मंडळ कार्यकारी संचालक यांच्यावर कठोर करावी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!