प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – प्रा.रामदास झोळ फाऊडेंशन करमाळा यांच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवाचा सपत्निक सन्मान सत्कार सोहळा स्नेह मेळावा राजयोग हाॅटेल करमाळा येथे रविवार (दि.७) संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सचिव माया झोळ, दैनिक सकाळचे माजी संपादक श्रीराम पवार, करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय प्रमुख डाॅ.विशाल बाबर उपस्थित होते.
यावेळी असे मत जेष्ठ पत्रकार आय बी एन लोकमतचे माजी कार्यकारी संपादक मंदार फणसे हे बोलताना म्हणाले की, “लोकशाहीमध्ये समाजाला जागे करण्याचे काम पत्रकार बांधवांना करावे लागत असून भयभयीत समाजाला दिशा दाखवण्यासाठी जागल्याची भुमीका घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी चालवावी लागते. सध्याच्या युगामध्ये मोबाईल फेसबुक व्हाट्सअप ट्विटर यांच्या माध्यमातून बातमीमध्ये ब्रेकिंगची स्पर्धा चालू असून अशा परिस्थितीमध्येही समाज मनाचे भान जपत समाजाला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधून ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण लेखणीच्या माध्यमातून आवाज उठून ते प्रश्न मार्गी लागेपर्यंत बातमीमधुन पाठपुरावा करणे गरजेचे आहे. समाजात घडणाऱ्या बदलाबरोबर समाजात असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले तर समाजाचे पाठबळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे.
बदलत्या ऋतुमानाचा हवामान बदलाचा फटका आपणाला बसणार असून त्यामुळे पाण्याअभावी अन्नधान्याचे उत्पादन ही घटणार आहे. याचे थेट परिणाम आपणा सर्वांना भोगावे लागणार आहे . नुसता पाऊस पडला नाही पडला म्हणून चालणार नाही पावसामुळे होणाऱ्या परिणामाचा विचार करून त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी कशाची गरज आहे. याची दृष्टी समाजाला व्यवस्थेला देण्याचे काम पत्रकाराला करावे लागणार आहे. जगाला विकासाला दिशा देणारा रोबोट पेक्षाही वेगवान असणारा मानवी मेंदू हा पत्रकाराचा असून पत्रकारांनी वर्तमान परिस्थितीनुसार भविष्याचा वेध घेत समस्याचा उकल करत विकासात्मक पत्रकारिता केली तर या समाजाचे कल्याण होईल. यासाठी पत्रकाराची जबाबदारी मौलाची आहे. प्रा. रामदास झोळ सर आयोजित केलेला पत्रकार कुटुंब सन्मान सोहळा हा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी दैनिक सकाळचे माजी संपादक श्रीराम पवार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या युगामध्ये पत्रकारितेमध्ये वेगवान डिजिटल मीडियाची प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिजिटल माध्यमे समाजमन व्यापून टाकत आहेत. या माध्यमांवर लोक मते मांडतात. मात्र तुम्ही पत्रकार समाजाला विचार देता. ही बदलत्या काळाची पावले आपण ओळखायला हवीत. या काळाचे संक्रमणही मागे जाईल. मात्र वर्तमानपत्र टिकून राहतील. कारण वर्तमानपत्रे विचार करायला भाग पाडतात. डिजिटल माध्यमांमुळे वृत्तपत्रांचा खप कमी झाला, असे म्हटले जाते. मात्र वृत्तपत्रे वाचणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पानाच्या ठेल्यापासून भारतात सर्वत्र वर्तमानपत्राचा वाचकवर्ग आहे. वस्तूनिष्ठ लेखन करणारे पत्रकार आहेत. जोपर्यंत ही वस्तूनिष्ठ पत्रकारिता टिकून राहील.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे सचिव नासिर कबीर अशोक नरसाळे दिनेश मडके ,आशपाक सय्यद, अलीम शेख अशोक मुरूमकर, सचिन हिरडे शितलकुमार मोटे, विशाल घोलप सचिन जव्हेरी ,संजय शिंदे, जयंत दळवी, बाळासाहेब भिसे,राजेश गायकवाड, सुहास घोलप,सिध्दार्थ वाघमारे हर्षवर्धन गाडे, विशाल परदेशी नागेश चेंडगे किशोर शिंदे तुषार जाधव ,सागर गायकवाड, गिरीश पाटील,दिपक फरतडे, तात्या सरडे,अंगद भांडवलकर दस्तगीर मुजावर, संजय मस्कर,संजय जाधव, संजय कुलकर्णी, नितीन घोडेगावकर, सुयोग झोळ, संतोष केसकर,बाळासाहेब सरडे, सचिन बिचीतकर ,नानासाहेब पठाडे,उमेश पवळ, जयंत कोष्टी, राहुल रामदासी,अतुल बोकन ,अंगद देवकते धर्मराज दळवी यांचा मंदार फणसे श्रीराम पवार प्रा रामदास झोळ, माया झोळ यांच्या हस्ते सपत्नीक शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन सौ.संगिता खाडे दराडे स्वागत व आभार विक्रम दास यांनी मानले. प्रा.प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचा भव्य कार्यक्रमांमध्ये यथोचित मानसन्मान सत्कार केल्याबद्दल त्यांचे पत्रकार बांधवांच्यावतीने कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्था सर्व शिक्षक कर्मचारी स्टाफ प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.