आरक्षणाबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू कराव्यात – प्रा. रामदास झोळ
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे या समाजाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या समाजाला आरक्षण मिळून घेण्यासाठी मनोज जरांगे-पाटील शर्तीचे प्रयत्न करत आहेत ती मागणी पूर्ण होणे गरजेचे आहे परंतु मराठा समाजाची विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक सवलती आरक्षणाशिवाय लागू करून खऱ्या अर्थाने या समाजाचा सर्वांगीण विकास होईल असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाली की धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याबाबत महादेव जानकर यांच्याशी चर्चा करून एसटी आरक्षण लागू करण्याचा त्यावेळी प्रयत्न केला पण आरक्षण लगेच देणे शक्य नसते आणि आदिवासी समाजाला ज्या सवलती दिल्या जातात त्याप्रमाणेच धनगर समाजालाही आदिवासी समाजाच्या सवलती दिल्या आहेत. मराठा समाजही सध्या बिकट अवस्थेत असून सध्या घटनात्मक आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. खऱ्या अर्थाने या समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय प्रामाणिक अडीच लाख उत्पन्न असलेल्या पाल्यांना शंभर टक्के फी सवलत देण्यात यावे याचबरोबर वस्तीगृह भत्ता म्हणून मराठा प्रवर्गातील अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना शोधार स्वयं योजना अंतर्गत एससी एसटी धनगर समाजाप्रमाणे तालुका स्तरासह ग्रामीण भागासाठी वस्तीग्रह भत्ता देण्यात यावा.
ज्युनियर महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सायन्स अभ्यासक्रमास पंचवीस हजार कॉमर्स आर्ट अभ्यासक्रमात दहा हजार शिष्यवृत्ती देण्यात यावी. इंग्रजी नामांकित शाळांमध्ये आदिवासी धनगर समाजाच्या विद्यार्थ्याप्रमाणे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अडीच लाखाची आज उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील पालकाच्या पाल्यांना पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे. व्यावसायिक प्रवेश प्रक्रियेच्या कॅम्प राऊंडच्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर कोट्यातील जर जागा शिल्लक राहिल्या तर त्या जागी संस्था स्तरातील कोट्यातून पात्र विद्यार्थ्यांना जागा भरण्यास परवानगी देण्यात येईल.
ईडब्ल्यू एस प्रवर्गाच्या प्रवेशाची सुधारित धोरण केंद्र शासन व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू करण्यात यावी तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 25 टक्के जागा वाढवून दिलेले आहेत. या सर्व जागा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाने देखील डब्ल्यू एस आरक्षण राबवण्यासाठी 25% जागा वाढवून देणे गरजेचे आहे डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार योजना लागू करण्यात येऊन शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी 50 टक्के हिस्सा केंद्र सरकारने देण्यात यावा शासनामार्फत मागासवर्गीय प्रयोगासाठी ज्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती सवलत दिली जाते त्या सर्व अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा सवलत देण्यात यावी अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी केली असून सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती जशा लागू करून न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने मराठा समाजालाही शैक्षणिक सवलती लागू करून या समाजाला न्याय द्यावा तसेच घटनात्मक पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसेल अशा पद्धतीने आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.