करमाळा तालुक्याच्या विकासासाठी भूमिपुत्र म्हणून मला एक वेळ आमदार म्हणून संधी द्यावी – प्रा.रामदास झोळ
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्तेसाठी पैशासाठी नाही, तर शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगारनिर्मिती, विकासासाठी ”भूमिपुत्र” म्हणून मला एक वेळ निवडून देऊन, काम करण्याची संधी द्यावी. असे आवाहन प्रा.रामदास झोळ यांनी वाशिंबे (ता.करमाळा) येथील सभेत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर “बहुजन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे” अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष गफूर शेख, प्रा. रामदास झोळ सर यांचे वडील मधुकर झोळ, अनुरथ झोळ, पांडुरंग झोळ, लालासाहेब जगताप सर, सौ मायाताई झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, रिपब्लिकन पार्टीचे नेते यशवंतराव गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, ह.भ.प कल्याण खाटमोडे, श्रीकांत साखरे पाटील उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, रस्ते, वीज, पाणी ही कामे लोकप्रतिनिधीला करावीच लागतात. परंतु याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रोजगार ही प्रश्न मार्गी लावणे, लोकप्रतिनिधीचे काम असते. करमाळा तालुक्यातील गावांमधील रस्ते, पाण्याबाबत प्रश्न वर्षानुवर्ष तसाच आहे. तो प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच शिक्षण व रोजगार निर्मितीसाठी देवळाली येथे शिक्षण संकुलाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करणार आहे. याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी भव्य नोकरी महोत्सवाच्या आयोजन करून युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीतही करमाळा तालुका मागास असून सर्व सोयींनी युक्त, तज्ञ डॉक्टरांना बरोबर घेऊन प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्यावतीने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सवलतीच्या दरामध्ये सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या सभेचे प्रास्ताविक स्वागत श्रीकांत साखरे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नवले सर यांनी केले. तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले. या सभेला शेतकरी, युवक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.