प्रा.सुहास पाटील यांचा कंदर येथे सत्कार..
कंदर / प्रतिनिध : संदीप कांबळे
कंदर : रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा.सुहास पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या ऊस दर नियंत्रण समितीच्या सदस्य पदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल कंदर (ता करमाळा) येथील ग्रामस्थांच्यावतीने प्राध्यापक सुहास पाटील यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे माजी संचालक नवनाथ शिंदे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे माजी सरपंच दस्तगीर मुलानी सोसायटीचे माजी चेअरमन श्रीहरी शिंदे उपसरपंच मौला मुलानी विजय प्रताप युवा मंच चे बंडू माने सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक राजकुमार पराडे माजी उपसरपंच कुबेर शिंदे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष संपत सरडे ग्रामपंचायत सदस्य दिलदार मुलानी सोसायटीचे सदस्य आबासाहेब सुरवसे सुभाष पवार चैतन्य पाठक राजकुमार भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काळे यांनी करून आभार मानले. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक सुहास पाटील म्हणाले की माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दरा बाबतच्या अडचणी सोडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल व शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तसेच याप्रसंगी कंदर येथील तुषार शिंदे यांची इंडियन फॉरेस्ट सर्विस या विभागात वर्ग एक मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे वडील श्रीहरी शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला..