करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील 41 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 38 कोटी 65 लाख रुपये निधीची तरतूद – आ.संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – 2 आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 185 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जेन्नती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 170 कोटी 72 लाख 48 हजार निधीची तरतूद झालेली असून त्यापैकी करमाळा – माढा विधानसभा मतदारसंघातील 41 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 38 कोटी 65 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली असून कामाची 5 वर्षे नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी 2 कोटी 82 लाख 68 हजार निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण भागातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने मधून निधी दिला जात असतो. करमाळा मतदारसंघासाठी मिळालेल्या 38 कोटी 65 लाख निधी मधून मतदार संघातील 3 रस्त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे .हे 3 रस्ते 10 गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते आहेत.
यामध्ये कुंभेज ते वरकटणे – साडे – आळसुंदे या 16.20km अंतर असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 13 कोटी 1 लाख 68 हजार निधी मंजूर झालेला असून त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 85 लाख 68 हजार निधीची तरतूद केलेली आहे. वीट – अंजनडोह ते उमरड या 8 km रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 6 कोटी 81 लाख 19 हजार निधीची तरतूद असून त्याच्या नियमित देखभालीसाठी 46 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे .रामा 202 ( कुर्डूवाडी) ढवळस ते भोगेवाडी ते प्रजिमा 12 या 17.2 00 किमी अंतर असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 18 कोटी 93 लाख 17 हजार निधीची तरतूद केलेली असून त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 1 कोटी 51 लाख 27 हजार निधीची तरतूद केलेली आहे मतदारसंघासाठी मिळालेल्या 38 कोटी 65 लाख निधी मधून ग्रामीण भागातील 41 किलोमीटर लांबीचे रस्ते मजबूत होणार आहेत .यापूर्वीच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून ग्रामीण मार्गाच्या मजबुतीकरणासाठी 14 कोटी निधी 2022 – 23 मध्ये मंजूर झाला असल्याची माहिती ही आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करमाळा तालुक्यासाठी 10 कोटी
करमाळा तालुक्यातील ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीसाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 9 कोटी 95 लाख 76 हजार असा निधी 2022 -23 मध्ये मंजूर झाला आहे.या निधीमधून पांगरी ते वांगी या रस्त्याची सुधारणा करणे ,चढ काढणे या कामासाठी 4 कोटी 66 लाख 50 हजार निधी मंजूर असून करमाळा हिवरवाडी, वडगाव दक्षिण ते वंजारवाडी या ग्रामीण मार्गाची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी 29 लाख 26 हजार असा निधी मंजूर आहे.
जिल्हा नियोजन मंडळातून ग्रामीण मार्गाच्या मजबुतीकरणासाठी 3 कोटी 35 लाख निधी…
या निधीमधून कुंभारगाव ते घरतवाडी ग्रामीण मार्ग 5 ,दिवेगव्हाण ते कुंभारगाव रस्ता ग्रामीण मार्ग 13 , पोफळज ते सोगाव पूर्व रस्ता ग्रामीण मार्ग 79 ,कोर्टी ते हुलगेवाडी रस्ता ग्रामीण मार्ग 4,सौंदे ते गावडे वस्ती रस्ता ग्रामीण मार्ग 176 , सांगवी तळे वस्ती कोरे वस्ती ते सांगवी नंबर 2 रस्ता ग्रामीण मार्ग 169 ,उमरड ते झरे रस्ता ग्रामीण मार्ग 20, वाघाची वाडी ते जिल्हा हद्द वाणीचिंचोली रस्ता ग्रामीण मार्ग 33 ,रामवाडी ते वारगड वस्ती रस्ता ग्रामीण मार्ग 51 , लव्हे ते कोंढेज रस्ता ग्रामीण मार्ग 59, हिसरे सालसे यमाई मंदिर रस्ता ग्रामीण मार्ग 90, देवळाली ते बादल वस्ती ते इजिमा 6 रस्ता ग्रामीण मार्ग 142, जेऊरवाडी शिरसवाडी ते जेऊरवाडी रस्ता ग्रामीण मार्ग 150 , वांगी नंबर 2 ते तकिक वस्ती ते राज्य मार्ग 125 रस्ता ग्रामीण मार्ग 153 , बिचितकर वस्ती नंबर 1 बोगदा रस्ता ग्रामीण मार्ग 188 , अंजनडोह ते घरकुल रस्ता ग्रामीण मार्ग 207 या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर असून वीट ते देवळाली रस्ता ग्रामीण मार्ग 22 - 30 लक्ष , पोंधवडी ते उमरड रस्ता ग्रामीण मार्ग 272 - 30 लक्ष, खातगाव, गुळवे वस्ती रस्ता ग्रामीण मार्ग - 19 लक्ष याप्रमाणे ग्रामीण मार्गाच्या सुधारणा करण्यासाठी 2 कोटी 39 लक्ष निधी मंजूर झालेला आहे.
इतर जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी 95 लक्ष निधी मंजूर आहे यामध्ये उमरड इजीमा 2, फिसरे हिसरे कोळगाव रस्ता, देवळाली पांडे अर्जुननगर रस्ता, सौंद ते गुळसडी देवळाली रस्ता, सांगवी प्रमुख राज्य मार्ग 8 ते प्रमुख जिल्हा मार्ग 12 ते सातवली या रस्त्यांसाठी प्रत्येकी 15 लाख तसेच पाडळी ते जिल्हा हद्द रस्ता 19 - 10 लक्ष ,प्रतिमा 5 ते दहीखिंडी ते करंजे रस्ता - 10 लक्ष असा इतर जिल्हा मार्गांच्या सुधारण्यासाठी 95 लक्ष निधी मंजूर आहे.
सन 2022 -23 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामीण मार्गाच्या मजबुतीकरणासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व जिल्हा नियोजन मंडळ यांच्या माध्यमातून 51 कोटी 75 लाख 76 हजार निधी मंजूर झाला आहे.