करमाळा तालुक्यातील ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ‘भाजपा’त जाहीर प्रवेश
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भारतीय जनता पार्टी करमाळा विधानसभा मतदारसंघाची बुथ सशक्तिकरण अभियान आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्र विभाग बुथ संयोजक योगेश बाचल यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली, याच बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘भाजपा’मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
या बैठकीत बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांना माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे ,सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग बुथ संयोजक योगेश बाचल, सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून करमाळा विधानसभा प्रभारी शिवाजी कांबळे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे लोकसभा विस्तारक शरद झेंडे माढा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उमेश पाटील बाळासाहेब कुंभार उपस्थित होते.
या बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन झिंजाडे,देवळाली गावचे माजी उपसरपंच संदिपान कानगुडे, टाकळीचे युवा नेते महाराष्ट्र चॅम्पियन धनंजय गोडसे, वीट गावचे युवा नेते हरिभाऊ आवटे ,विहाळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शिवाजी नाळे, अक्षय भुजबळ, तसेच राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन झिंजाडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कामगार सेलचे करमाळा तालुकाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर तालुका उपाध्यक्ष अनिल आरणे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर तालुका उपाध्यक्ष राजू पवार,राष्ट्रवादी किसान सेलचे शिवाजीराव शिंदे , गणेश वाळुंजकर, आप्पासाहेब खटके, यशवंत झिंजाडे, भारत पाटील, पिनू ठोंबरे, अनिकेत रणवरे, शांतीलाल झिंजाडे, हरिभाऊ शिंदे, अक्षय झिंजाडे या सर्वांनी त्यांच्या समर्थकास भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी केले. या बैठकीसाठी करमाळा विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.