“रामवाडीतील कार्यकर्त्यांचा बागल गटात जाहीर प्रवेश..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रामवाडी (ता.करमाळा) येथील संजयमामा शिंदे यांचे समर्थक असलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप गुंजाळ, कैलास पेटकर, दशरथ गुंजाळ यांनी संजयमामा शिंदे यांची साथ सोडत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून बागल गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
करमाळा येथे ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिग्विजय बागल यांना ताकद देणार असल्याचे सांगितले, आणि त्यामुळे आमच्या गावचे प्रश्न सोडविण्यासाठी दिग्विजय बागल व बागल कुटुंबच गावच्या विकासासाठी मदत करू शकतील हा विश्वास असल्याने आम्ही प्रवेश करत आहोत असे सर्व कार्यकर्त्यांनी सांगून प्रवेश केला आहे. येत्या 20 तारखेला शिवसेना महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना गावातून भरघोस मत मिळवून देऊन निवडून आणू असेही त्यांनी म्हटले आहे.