शेटफळ येथे 'नागराज दिनदर्शिकेचे' प्रकाशन.. - Saptahik Sandesh

शेटफळ येथे ‘नागराज दिनदर्शिकेचे’ प्रकाशन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ येथील उद्योजक वैभव पोळ यांनी प्रकाशित केलेल्या नागराज दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.विठ्ठल पाटील महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. राममंदिर शेटफळ येथे झालेल्या कार्यक्रमाला चिखलठाण येथील किर्तनकार विलास महाराज सरडे पत्रकार गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे,कृष्णा सातपुते, शहाजी धेंडे, भगवान लोखंडे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना विठ्ठल पाटील महाराज म्हणाले की करमाळा तालुक्यातील प्रथमच ठिबक उत्पादन कंपनीची सुरवात करून शेतकऱ्यांना याबरोबरच उत्तम दर्जाचे पी. व्ही. सी. पाईप उपलब्ध करून दिले आहेत. अल्पावधीत जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर वैभव पोळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेली प्रगती कौतूकास्पद आहे.त्यांनी एवढ्यावर न थांबता परिसरातील शेतकऱ्यांना गरजेच्या इतर वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी स्वयंपुर्ण होण्यासाठी सुरू केलेल्या प्रत्येक उपक्रमाला शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळणार आहे.दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनाचा प्रसार तर होईल परंतु या दिनदर्शिकेत तिथी,वार सण उत्सव यांची माहिती असल्याने नवीन दिनदर्शिका विकत घेण्याची गरज भासणार नाही लोकांना त्याचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!