'गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन' संस्थेत 'वसूबारस'निमित्त गो-मातेची पूजा.. - Saptahik Sandesh

‘गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन’ संस्थेत ‘वसूबारस’निमित्त गो-मातेची पूजा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे वसू बारस निमित्त मोठ्या उत्साहात गो – मातेची पूजा करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी करमाळा तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.यादव त्यांचे सहकारी यांचे सह गोशाळेचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळेस गो – मातेला बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, गूळ याचा नैवेद्य दाखवून मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळेस गोसेवा समितीचे जगदीश शिगची यांनी आलेल्या डॉक्टरांचे व सर्व उपस्थित मान्यवरांचे गो – मातेचे महत्व सांगून आभार मानले.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष खाटेर यांनी गोशाळे संदर्भात माहिती दिली व सर्वाना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या.गोशाळा स्थापन झाल्यापासून गो मातेची सेवा करणारे पोपटराव काळदाते यांच्या परिवाराच्यावतीनेही गोमातेची पूजा करण्यात आली.

यावेळी नगरसेविका संगीता खाटेर, नितीन दोशी, अनिलशेठ सोळंकी,दिनेश मुथा,वैभव दोशी, आशिष बोरा, जीवन संचेती,प्रीतम दोशी,संतोष बन्सीलाल कटारिया, गणेश बोरा,मार्केट कमिटीचे ढाणे, अर्बन बँकेचे कुलकर्णी मॅडम व त्यांचा परिवार,स्पर्श सोळंकी,प्रीतम राठोड, गिरीश शहा, विजय बरीदे, चंद्रकांत काळदाते, ह. भ. प. अमोल महाराज काळदाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!