दोषींना तात्काळ कठोर शिक्षा करा!

करमाळा (दि.१८) – परभणीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना व तोडफोड करून संविधानाचा अपमान करणार्या गुन्हेगारास तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी, परभणीतील संविधान प्रतिकृती तोडफोडीच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना अनेक भीम सैनिक अनुयांकडून जो उद्रेक झाला त्या संदर्भातील अनेक विविध गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे रद्द करून दोषमुक्त करण्यात यावेत. तसेच पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्याला न्याय मिळवून द्यावा. आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींस आर्थिक मदत व शासकीय सेवेत घेण्याची मागणी आदी मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील विविध संघटनांनी आंदोलन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिले.

करमाळा येथील यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने करमाळा शहरातून रविवारी (दि.१५) रॅली काढत आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सुभाष चौक,पंजाब वस्ताद चौक, डॉ. गायकवाड चौक, महात्मा ज्योतीराव फुले पुतळा मार्गे हा मोर्चा दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयावर आला. याठिकाणी विविध आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवत आपल्या मनोगतातून या परभणीतील प्रकाराचा निषेध व्यक्त केला. यानंतर नायब तहसीलदार माजिद काझी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

तसेच वंचित सुभाष ओव्हळ, देविदास भोसले, विशाल लोंढे, संभाजी कांबळे, शिवाजी भोसले, एकनाथ शिंदे, दादासाहेब भोसले, ब्रह्मदेव काळे, आण्णासाहेब महनवर, सचिन घोडके संगीता गायकवाड आदी जणांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन दिले.

करमाळा येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे मा. जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते,धनगर धर्म पिठ जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टकले, आरपीआयचे नेते अर्जुन गाडे, कामगार आघाडीचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, विकास मेरगळ, राजेंद्र सरतापे,नामदेव पालवे, सुभाष देडगे, लक्ष्मण शिंदे, आण्णासाहेब महानवर, इत्यादी सह उपस्थितीत होते.

मी वडार महाराष्ट्र संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रमेश पवार, पत्रकार प्रविण मखरे, अध्यक्ष नामदेव पालवे, शेखर धोत्रे, लक्षमण देडगे, विक्रम धोत्रे, पप्पू कांबळे, अतुल गायकवाड, सुमित गाडे,उत्तम गिरी विजय पवार उपस्थित होते.

करमाळा येथील बसप च्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी संजय शिंदे, लहू भालेराव, दारासिंह शिंदे, शांताराम कदम, रमेश भोसले, दशरथ गाडे, शिवाजी पोळ, ज्ञानदेव गायकवाड, दीपक गाडे, बबन कांबळे, अनिल जोगदंड, राम भोसले, बबन गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




