रवींद्र धंगेकरांचा विजय हा 'सामान्य जनता,जातीयवादी शक्ती आणि महागाई'च्या विरोधातला कौल आहे - प्रतापराव जगताप -

रवींद्र धंगेकरांचा विजय हा ‘सामान्य जनता,जातीयवादी शक्ती आणि महागाई’च्या विरोधातला कौल आहे – प्रतापराव जगताप

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रवींद्र धंगेकरांचा विजय हा ‘सामान्य जनता,जातीयवादी शक्ती आणि महागाई’च्या विरोधातला कौल आहे असे मत करमाळा तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर व्यक्त केले.

याबाबत पुढे बोलताना श्री.जगताप म्हटले कि, आजवरचा कॉंग्रेस पक्षाचा इतिहास आहे की, ज्या ज्या वेळी कॉंग्रेसला संम्पवण्याचा प्रयत्न झाला, त्या त्या वेळी क्रांती ही पुण्याच्या मध्यवर्ती भागातुन घङली आहे, मग अगदी लोकमान्य टिळकांपासुनची उदाहरणे आहेत , जे मध्यवर्ती पुण्यात होते, तेच हळु हळु संपुर्ण महाराष्ट्रात झाले आहे, आणि पुढेही गतिमानतेने सुरू राहील, धंगेकरांचा विजय हा सामान्य जनता , बेरोजगार युवक युवती, व्यापारी यांनी दिलेला जातीयवादी शक्ती आणि महागाई च्या विरोधातला कौल आहे असाही विश्वास करमाळा काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!