साडे येथे मटक्यावर छापा – एक इसम रंगेहाथ पकडला

करमाळा (दि.२२ जुलै): साडे गावातील बसस्टॅन्डजवळ मटका जुगार चालवत असलेल्या इसमावर पोलीसांनी छापा टाकून त्यास रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व ₹1750/- ची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई दि. 19 जुलै 2025 रोजी दुपारी 12.45 वा. सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस नाईक हणुमंत गोरख भराटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की, साडे गावातील बसस्टँडजवळ चिकन सेंटरच्या बाजूला दिलीप बाबुराव बेलार (वय 68, रा. साडे, हा इसम मटका जुगार चालवत होता.तेथे तपासादरम्यान त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे स्लिप बुक – ज्यावर आकडे लिहिलेले होते. निळ्या शाईचा बॉलपेन व रोख रूपये 1750/- मिळाले
या प्रकरणी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





