नेरले येथील पावसाची भाकणूकची परंपरा

0

करमाळा तालुक्यातील नेरले गावात मारुतीचे मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दोन हनुमंताच्या मूर्ती आहेत त्यामुळे या मंदिराचं एक वेगळेपण दिसून येते. श्रावण महिन्यात मारुतीच्या मंदिरामध्ये सप्ताह असतो. या ठिकाणी रोज रात्री कीर्तन भजनाचे कार्यक्रम असतात . सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातील तिसऱ्या शनिवारी पावसाची भाकणूक केली जाते. यावर्षी शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पावसाची भाकणूक केली जाणार आहे तरी तालुक्यातील मंडळींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे नेरले ग्रामस्थांनी आव्हान केले आहे.. प्रत्येक वर्षी .कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक लोक हजेरी लावतात. या दिवशी गावातील एकच नाव असणारे दोन लहान मुले निवडली जातात. त्यांना दिवसभर उपवास धरण्यासाठी सांगितले जाते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या अंगाला राख लावली जाते व वस्त्र न घालता समोरासमोर उभे केले जाते. दोघांच्या बाजूनी बांबूच्या कांबि लावल्या जातात आणि इथून पुढील नक्षत्रामध्ये पाऊस असेल तर सीता जुळाव्यात नसेल तर फुलगाव्यात अशी विचारणा केली जाते. त्यानुसार ज्या नक्षत्रामध्ये पाऊस आहे त्यावेळेस त्या बांबूच्या कांबी एकमेकाला मिळतात जर पाऊस नसेल तर त्या परस्परांपासून दूर होतात अशा पद्धतीचे भाकित वर्तविले जाते. ही परंपरा फार वर्षापासून चालू आहे आणि तो अंदाज जवळजवळ 90 टक्के सत्य होतो. विज्ञान युगात देखील लोकांची श्रद्धा आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी काल्याचे किर्तन असते व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि कार्यक्रमाची सांगता होते.

  • प्रा. धनंजय पन्हाळकर, नेरले करमाळा,जिल्हा सोलापूर ( Mo. 9423303768)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!