शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलासाठी चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी बैठक बोलवणार – राजाभाऊ कदम

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील मकाई, भैरवनाथ, कमलाई, तसेच बाहेरील घागरगाव, हिरडगाव, या साखर कारखान्यांनी 30 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांची उसाची बिले काढावीत अशी मुदत दिली होती.
जर 30 एप्रिल पर्यंत उसाची बिले नाही काढली तर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढणार असा इशारा दिला होता परंतु या कारखान्यांनी थकीत उसाची बिले शेतकऱ्यांची काढली नाहीत, त्यामुळे कारखान्यांच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी बहुजन संघर्ष सेनेच्यावतीने लवकरच कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढणार असून, या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांची दोन दिवसात बैठक घेऊन पहिल्यांदा कोणत्या साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढायचा हे निश्चित ठरवणार आहे, अशी माहिती बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी दिली.

दिलेल्या निवेदनात राजाभाऊ कदम यांनी म्हटले आहे कि,
थकीत उसाची बिले मिळावीत म्हणून, बहुजन संघर्ष सेनेच्यावतीने दहा एप्रिल रोजी कुंभेज फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, आंदोलनामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, कारखाने शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळतात, शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे काही घेणे देणे नाही, मकाई साखर कारखान्याने नोव्हेंबर महीन्यापासुन ऊसाची बिले थकवली आहेत, त्यामुळे लवकरच कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढणार आहे या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांची दोन दिवसात बैठक घेऊन पहिल्यांदा कोणत्या साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढायचा हे निश्चित ठरवणार आहे. असेही राजाभाऊ कदम यांनी म्हटले आहे.