राजर्षी शाहू आदर्श सरपंच, ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्यात रवींद्र वळेकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान… -

राजर्षी शाहू आदर्श सरपंच, ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्यात रवींद्र वळेकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान…

0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण…

करमाळा / प्रतिनिधी
करमाळा : स्थानिक स्वराज्य संस्था या पंचायत राज व्यवस्थेचा कणा आहेत. ग्रामपंचायत पासून खऱ्या अर्थाने देशाच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात होत असते. आपल्या गावाला आदर्श बनवण्यासाठी झटणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांचा वाटा लोकशाही मजबूत करण्यात महत्वपूर्ण असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्य अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केले.

त्या राजर्षी शाहू आदर्श सरपंच,आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्यात बोलत होत्या. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान,दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राजर्षी शाहू आदर्श सरपंच व ग्रामसेवक पुरस्कार 2024 सोहळा संपन्न झाला.

पत्रकार संघाचा यावर्षी चा छत्रपती शाहू आदर्श सरपंच पुरस्कार करमाळा तालुक्यातील रविंद्र वळेकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सरपंच रवींद्र वळेकर यांनी एक वर्षाच्या आत महिला सक्षमीकरण, आरोग्य स्वच्छता, व बालकांसाठी पौष्टिक आहार, आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबविले आहेत. या प्रेरणादायी कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, श्री.वळेकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे ,पंचायत समितीचे माजी सदस्य विलास दादा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काका राऊत यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!