वन लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल राजेश धोत्रे यांचा सत्कार
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील राजेश धोत्रे यांची पुणे विभागात वन लेखापाल पदी निवड झाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर करमाळा तर्फे सत्कार आयोजित करण्यात आला करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री बालाजी लोंढे यांच्या हस्ते राजेश धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या वनविभागाच्या परीक्षेत राजेश धोत्रे यांनी पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावला करमाळा नगर परिषदेमार्फत चालिवले जाणाऱ्या श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर अभ्यासिकेत ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होते. ह्यावेळी मुख्याधिकारी लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारास उत्तर देताना श्री धोत्रे यांनी श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर ग्रंथालयाच्या अभ्यासिकेचा व ग्रंथालयाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
सूत्रसंचालन श्री घोलप यांनी केले यावेळी नगरपरिषदेचे लेखाधिकारी समीर नदाफ कर निरीक्षक स्वप्नील बाळेकर व इतर कर्मचारी तसेच अभ्यासिकेतील वाचक व विद्यार्थी रोहित चौकटे अजीम खान विकी कांबळे जगदीश चव्हाण महेश भागवत उपस्थित होते.