भाजपा शहर उपाध्यक्षपदी राजू सय्यद

करमाळा (ता.२९): भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीशजी अग्रवाल यांनी भाजपा शहर उपाध्यक्षपदी राजू सय्यद यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते श्री. सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. सय्यद यांचे योगदान व केलेले कार्य पाहून त्यांची निवड करण्यात आली आहे. यानिवडीनंतर श्री. चिवटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे, उपाध्यक्ष बंडूशेठ शिंदे, जयंत काळे पाटील, भैय्याराज गोसावी, वसिम सय्यद, गणेश वाळुंजकर, संतोष जमदाडे, विवेक अवसरे, महीला आघाडीच्या राजश्री खाडे, चंपावती कांबळे, पुजा माने, भैय्या कुंभार, गणेश झाकणे, शिवकुमार चिवटे, शिवाजी कुंभार यांच्यासह राजू सय्यद यांचा मित्रपरिवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.





