परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने राजुरीत रक्तदान शिबिर

करमाळा: राजुरी, ता. करमाळा येथे दि. २३ ऑक्टोबर रोजी दीपावली व राजेश्वर हॉस्पिटलच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान, राजुरी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

२०१० पासून चालत आलेल्या या उपक्रमात यावर्षी ५१ जणांनी रक्तदान केले. या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिबिर संयोजक डॉ. अमोल दुरदे यांनी दिली.

शिबिराचे उद्घाटन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच राजेन्द्र भोसले, सचिव माया झोळ, ग्रामपंचायत सदस्य शरद मोरे, निलेश दुरंदे, एकनाथ शिंदे, आबासाहेब टापरे, विलास जाधव, सुधीर साखरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.




