निंभोरे येथे कृषी अवजारे बँक लोकार्पण सोहळा संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे महाराष्ट राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राणी लक्ष्मी महिला ग्राम संघ कृषी अवजारे बँक लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्री.मनोज राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे विद्यमान सरपंच मा.श्री. रविंद्र वळेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप उपस्थित होते.
बचत गटातील महिलांनी शेती कडे एक व्यवसाय म्हणून पहावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्कृष्ट शेती करून आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अवजार बँक लोकार्पण सोहळ्यात पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महिलांनी फक्त गृहिणी म्हणून न राहता मिळालेल्या कर्जातून वेगवेगळे व्यवसाय निर्माण करून उद्योजक व्हावे. तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन सेंद्रिय शेती, गट शेती करून आपली प्रगती करावी तसेच महिलांना योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन राऊत यांनी केले.
तालुका अभियान व्यवस्थापक श्री.जगताप साहेब यांनी अवजार बँकेचे महत्व सांगून ग्राम संघाने योग्य नियोजन करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे .तसेच कर्ज वेळेत परतफेड करणे, योग्य ते रजिस्टर अद्यावत ठेवणे, बाबत मार्गदर्शन केले. महिलांनी अवजार बँकचा लाभ घेऊन प्रगती करावी असे आवाहन केले.
यावेळी प्रभाग समन्वयक आकाश पवार, प्रशांत मस्तुद, ग्राम संघाचे पदाधिकारी, लिपिका, CRP मंजुश्री मुळे, सुषमा वाघमारे, व समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री .दिलीप मूळे यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन श्री.हनुमंत पवार यांनी केले.