रश्मी बागल यांच्या हस्ते पांगरे येथे जलजीवनचे लोकार्पण व विविध कामांचे भूमिपूजन संपन्न

करमाळा (दि.१०) : पांगरे येथील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, हरघर नल ही योजना पूर्ण झालेली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा भाजप प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांच्या शुभहस्ते व विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांच्या विषेश प्रयत्नातून मिळालेल्या निधी मधुन विविध योजना अंतर्गत, 3054 मधून दोन रस्त्यांसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये निधी, दलित वस्ती रस्त्यासाठी तीन लाख रुपयाचा निधी, त्याचबरोबर जन सुविधा मधून ग्रामपंचायत कार्यालय सुशोभिकरण करण्यासाठी चार लाख सत्तर हजार निधी दिलेला आहे.

प्रस्ताविक ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी केले. त्याचबरोबर कल्याण सरडे महाराज,विलासराव घुमरे, रश्मी बागल यांची भाषणे झाली. महिला सक्षमीकरणासाठी व तालुक्याचे विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे बागल यांनी सांगितले. आभार सरपंच प्रा. डॉ. विजया दत्तात्रय सोनवणे यांनी व्यक्त केले.

यावेळी जल जीवन योजनेसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाना कुलकर्णी व परिवाराचा, संकेत भैरवनाथ पारेकर यांची लातूर येथे अग्निशामक दलामध्ये निवड झाल्याबद्दल व विशाल दत्तात्रय टेकाळे यांची राज्य उत्पादन शुल्क पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे पालकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक श्री मोतीराम पिसाळ हे होते. या कार्यक्रमास आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब लोकरे, प्रकाश पाटील, पांडुरंग जाधव, ॲड. दत्तात्रय सोनवणे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीशबापू निळ, सचिन पिसाळ, युवराज रोकडे, गणेश तळेकर, कल्याण सरडे सर, विष्णू माने, माजी संचालक बापूराव कदम, बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ शिंदे, सुभाष पवार, वांगी वि. का. वि. सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. विजय रोकडे, रवीकाका जाधव, ग्रा. सदस्य गणेश वडणे, भैरवनाथ हराळे, मयुरा पिसाळ, माजी सरपंच पुष्पा पाडसे, अरुण पिसाळ, तुळशीदास वडणे, हरिदास टेकाळे, परमेश्वर पाडसे, भैरवनाथ पिसाळ, पोपट सातपुते, सहदेव दोंड, राजेंद्र ठोंबरे, महादेव तोबरे, लक्ष्मण दोंड, युवराज तोबरे, संतोष आरकीले, जोतिराम गाडे, सौदागर दोंड आदी गावातील बहुसंख्य महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.



