‘दहिगांव उपसा सिंचन’च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा सालसे चौकात ‘रास्तारोको’ आंदोलन..!

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दहिगांव उपसा सिंचन’च्या आवर्तन पाणी मिळण्यासाठी घोटी ग्रामस्थांनी सालसे (ता.करमाळा) येथील मुख्य चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. हा ‘रास्ता रोको’ आंदोलन माजी जि.प.सदस्य विलास राऊत व धनंजय ननवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

दहिगांव उपसा सिंचन ही योजना दहिगांव ते वरकुटे अशी 27 कि.मी. अंतर असून, दहिगांवपासून सुरवातीला सायपन पध्दतीने पाईप टाकल्या ने खाली पाणी येत नाही, सदर पाईप हे अधिकारी व कर्मचारी यांच्या संमतीने पाईप टाकल्या चे आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे, कुंभेज लिप्ट वर 750 एच.पी.चे चार पंप असून फक्त एक पंप सुरू असून तीन पंप बंद आहेत, अशा कारणाने शेवटच्या गावला पाणी येत नाही, संबंधीत खात्यास आंदोलन करणार असल्याचे निवेदन देवुनही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने एक तास आंदोलन चालले.

दहिगांव उपसा सिंचनचे उपअभियंता संजय आवताडे हे जबाबदार असल्याने त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी याप्रसंगी आंदोलकांनी केली. यावेळी जि.प. माजी सदस्य विलास राऊत , ग्रा.प.सदस्य धनू ननवरे तसेच नगर व धाराशिव जिल्हाचे जनशक्ती संघटेनेचे संपर्क प्रमुख राणा वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करमाळा पोलिस निरीक्षक गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले व त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मंडल अधिकारी कलेटवाड, तलाठी, बिराजदार, सहपोलिस कर्मचारी उपस्थित होते सदर आंदोलनासाठी घोटी सह वरकुटे , मलवडी , सालसे व आळसुंदे येथील बहुसंखेने शेतकरी उपस्थित होते.