खूप शिकून आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा -छोटा पुढारी घनश्याम दराडे

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – आजच्या काळात समाजामध्ये चांगला बदल घडवा आणी आई वडिलांचे स्वप्न साकार करा असे प्रतिपादन छोटा पुढारी घनश्याम दराडे यांनी केम येथील श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी शाळां व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष वसंत तळेकर हे होते. या वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सचिन श्रृंगारे, ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ,सागर कुरडे, विष्णू पंत अवघडे, युवा सेनेचे तालुका समन्वयक सागर राजे तळेकर भाजपाचे गणेश आबा तळेकर, धनंजय ताकमोगे, तसेच दिपक भिताडे, बापु तळेकर, दळवी सर, नाना तळेकर . उपस्थित होते.


पुढे बोलताना घनश्याम दराडे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण म्हणजे वाघीनीचे दूध आहे ते आपल्या ला पचवायला पाहिजे शिक्षणामध्ये ताकद आहे आपण शेतकऱ्यांची मुले आहोत तुम्ही चांगले शिकूण आपल्या माय बाप शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करा.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे के,एन यानी केले तर आभार मुख्याध्यापक कदम सर यांनी मानलें या वेळी पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

