‘बिबट्या’संदर्भात आमदार शिंदे यांनी वनअधिकाऱ्यांना कॅमेरा बसविण्याच्या केल्या सूचना..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथील परिसरात काल (ता.९) रात्री पुन्हा येथे बिबट्याने नागेश बागल यांच्या वासरावर हल्ला करून वासरू फस्त केले, यामुळे या परिसरातील नागरिकांवर भीतीचे वातावरण पसरले आहे, या घटनेची पाहणी करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (ता.१०) मांगी येथे बिबट्याने हल्ला केलेल्या नागेश बागल यांच्या शेतात भेट दिली व वन विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या व पिंजरे वाढीव बसविण्यात सांगितले.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी येथील लावलेला पिंजरा पाहणी करून पिंजऱ्याची संख्या वाढविण्यात यावी असे सांगितले तसेच प्रत्येक ठिकाणी कॅमेरा बसविण्यात यावे अशाही सुचना आ.शिंदे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याप्रसंगी यावेळी वनविभागाचे अधिकारी वन अधिकारी श्री.लटके, श्री.कुरले, सामाजिक कार्यकर्ते सुजिततात्या बागल ,अभिमान अवचर, तुषार शिंदे, सुरज ढेरे,आदेश बागल,नागेश बागल, पोलिस पाटील आकाश शिंदे,मनोज शिंदे व शेतकरी वर्ग उपस्थित होता.
संबंधित बातमी – बिबट्याचा वासरावर हल्ला – मांगी-पोथरे-कामोणे गावांमध्ये भितीचे वातावरण