रेखा वीर यांचे विजेचा शॉक लागून निधन.. - Saptahik Sandesh

रेखा वीर यांचे विजेचा शॉक लागून निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथील आर.जी.गाडेकर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाळासाहेब वीर सर यांच्या पत्नी रेखा बाळासाहेब वीर (वय-४२) यांचे विजेचा शॉक लागून आज (ता.२०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी करमाळा येथे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या गावाकडे रात्री अनपटवाडी येथे होणार आहे. त्यांचे मागे पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आज दुपारी घरी पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता, त्यांना शॉक लागला यातच त्यांचे निधन झाले, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!