संगोबा येथील मंदिरात २८ ते ३० जून दरम्यान धार्मिक उत्सवाचे आयोजन

करमाळा (दि. २७ जून) : तालुक्यातील प्राचीन आणि श्रद्धेचे केंद्र असलेले श्री आदिनाथ महाराज मंदिर, श्रीक्षेत्र संगोबा येथे दिनांक २८ ते ३० जून २०२५ या कालावधीत तीन दिवसीय धार्मिक उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

हा धार्मिक उत्सव श्री नर्मदेश्वर गुरुजी यांच्या प्रेरणेतून भक्तपरिवाराने सुरू केलेल्या अखंड ३६५ दिवस सात्विक नैवेद्य अर्पण सेवा (श्रीभोग व्रत) याची वर्षपूर्ती या उत्सवात साधण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध पारंपरिक धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.

🗓️ कार्यक्रमाचे वेळापत्रक:
🔸 शनिवार, २८ जून २०२५
– दुपारी ३.०० वा. : श्रीमद्भगवद्गीता पूजनासह भव्य पालखी पदयात्रा
➡️ मार्ग: कमलाई माता मंदिर, करमाळा ते श्री आदिनाथ महाराज मंदिर, संगोबा
➡️ पालखीत: नर्मदा मैया, कुलस्वामिनी कमलाई माता आणि श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ
🔸 रविवार, २९ जून २०२५
– सकाळी ९.०० वा. : लघुरुद्र अभिषेक
🔸 सोमवार, ३० जून २०२५
– सकाळी ७.०० वा. : रुद्र स्वाहाकार यज्ञ
– दुपारी १.०० वा. : महाप्रसाद

या तीन दिवसांच्या धार्मिक सोहळ्यात विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार, फुलांची सजावट, भजन-कीर्तन आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. पालखी सोहळ्याच्या वेळी टाळ-मृदंग, वाद्यवृंद, जयघोष आणि भक्तांच्या गजरात संपूर्ण संगोबा परिसर भक्तिरसात न्हालून निघणार आहे.

श्री आदिनाथ महाराज भक्त परिवारातर्फे सर्व श्रद्धाळू भाविकांना या पवित्र धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.




