मांजरगाव येथे स्मृतीवृक्षाचे रोपण करून केला सावडण्याचा विधी - Saptahik Sandesh

मांजरगाव येथे स्मृतीवृक्षाचे रोपण करून केला सावडण्याचा विधी

चंद्रभागा देवराव मोरे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मांजरगाव ता.करमाळा येथील प्रगतशील बागायतदार सुंदरदास देवराव मोरे व व माजी सरपंच कल्याण देवराव मोरे यांच्या मातोश्री चंद्रभागा देवराव मोरे यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी निधन झाले.

चंद्रभागा मोरे या अत्यंत सात्विक, कष्टाळू, स्वाभिमानी आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. वृद्धापकाळात सर्व मोरे कुटुंबीयांनी त्यांची समाजात आदर्शवत ठरावी अशी सेवा केली. चंद्रभागा मोरे यांच्या पाठीमागे दोन मुले, पार्वती काळे व नंदाबाई नलवडे या दोन मुली,11 नातवंडे व 18 पणतू असा मोठा परिवार आहे. सावडण्याच्या दिवशी मोरे कुटुंबीयांनी नदीपात्रात रक्षाविसर्जन न करता प्रदूषण टाळून स्वतःच्या शेतातच संपूर्ण रक्षा विसर्जन केली व त्या जागी स्मृतीवृक्ष लावला. गेली अनेक वर्षापासून मांजरगावमध्ये अशा पद्धतीने सावडण्याच्या दिवशी स्मृतीवृक्ष लावण्याची झालेली सुरुवात आता आसपासच्या अनेक गावांमध्ये राबवली जात आहे. या गोष्टीचा आदर्श घेऊन सर्वच समाजबांधवांनी अशा प्रथांचे अनुकरण करावे अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी आणि विवेकी समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!