आमदार शिंदे यांनी लक्ष घालून केम-टेंभुर्णी रस्ता दुरुस्त करवून घ्यावा – संदीप घोरपडे
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) :
टेंभुर्णी (ता.माढा) ते केम हा रस्ता अतिशय खराब झालेला असून आमदार संजय मामा . शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालून हा रस्ता तातडीने दुरूस्त करवून घ्यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे
यांनी केली आहे.
केम ही एक मोठी बाजारपेठ असल्याने दळणवळणासाठी हा रस्ता तितकाच महत्त्वाचा आहे. केम येथे रेल्वे स्टेशन असल्याने रेल्वेसाठी जाणाऱ्या नागरिकांना ह्या खराब रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. तसेच पुणे-सोलापूर हायवे ला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना टेंभुर्णीकडे जाण्यासाठीचा हाच मार्ग आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ह्या खराब रस्त्याचा त्रास होतो. जागोजागी पडलेले खड्डे वाहनधारकांची गाडी चालवताना कसरत होत आहे.
दवाखान्यात जाणाऱ्या नागरिकांची यामुळे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या टेंभुर्णी केम खराब रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी केला आहे. त्यामुळे आमदार संजय मामा शिंदे यांनी याकडे आवर्जून लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करवून घ्यावा असे मत श्री.
घोरपडे यांनी व्यक्त केले.