‘मलेशिया’देशातील ‘धर्मशक्ती वेदांत गुरुकुलम’च्या प्रतिनिधींनी दिली शेटफळ येथील नागनाथ देवस्थान मंदिराला भेट..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मूळ केरळ येथील भारतीय वंशाच्या असलेल्या व सध्या मलेशिया देशात स्थायिक असलेल्या वडीलांनी हिंदू धर्म प्रसार व प्रचासाठी सुरू केलेल्या गुरुकुलम् आश्रमाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या साध्वी विष्णू प्रिया व साधक बालूनिथीन यांना अयोध्येतील राममंदिर येथे मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे होत निमंत्रण होते या निमित्त ते पंधरा दिवसांसाठी भारतात आल्यानंतर त्यांनी नागोबाला देव समजून त्याची पूजा करणाऱ्या शेटफळ गावाबद्दल माहिती मिळाली व त्यांनी तातडीने शेटफळ (ता.करमाळा) येथील नागनाथ मंदिराला भेट दिली.

राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमित्ताने भारतात आल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणाला त्या भेटी देत दिल्या. काही दिवसांपूर्वी भारतीय संस्कृती विषयी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या कोब्रा जातीच्या नागोबाला देव समजून त्याची पूजा करणाऱ्या त्यांच्याविषयी श्रद्धा बाळगून त्याला आपल्या घरामध्ये स्थान देणाऱ्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या शेटफळ नागोबाचे या अनोख्या गावाविषयी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडीशी माहिती मिळाली होती.

तेव्हापासून या गावाविषयी त्यांच्या मनामध्ये कुतूहल होते मलेशिया येथे असतानाच भारतात गेल्यानंतर आपण या गावाला भेट द्यायची असे त्यांनी ठरवले होते. यानुसार त्यांनी आज या गावाला भेट देऊन या गावच्या अनोख्या वैशिष्ट्ये विषयी जाणून घेतले येथील पुरातन नागनाथ मंदिरात दर्शन घेऊन मंदीराचे फोटो घेतले. तब्बल तीन तास थांबून येथील लोकांशी मनमोकळा संवाद साधला.

भारतीय संस्कृतीचे परंपरांचे जतन करणाऱ्या या गावातील लोकांच्या मनामध्ये नागांविषयी अपार श्रद्धा आहे, येथे नागाला मारले जात नाही. घरातील सदस्य प्रमाणे त्याचा सांभाळ केला जातो हे पाहून ऐकून या गावाला भेट दिल्याचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
मूळच्या केरळ येथील असलेल्या त्यांच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी धर्मप्रसारासाठी मलेशियाला जाऊन तिथे हिंदू धर्माचा प्रचार व प्रसाराचे कार्य करत तेथे क्वालालंपूर येथे ‘धर्म शक्ती वेदांत गुरुकुलम् ची स्थापना होती विष्णूप्रिया सध्या या आश्रमाचे व्यवस्थापन पाहत असून त्यांना उत्कृष्ट हिंदी समजते व बोलता येते.

येथे आल्यानंतर लोकांशी संवाद साधताना त्यांना भाषेची कसलीही अडचण आली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्रातील नाशिक पंढरपूर कोल्हापूर या तीर्थक्षेत्राला भेट देऊन त्या मलेशियाला जाणार आहेत.


हिंदू धर्म हा फार सहिष्णु असा धर्म आहे या धर्मामध्ये प्रत्येक मानवालाच नव्हे तर प्राण्यालाही देवत्व दिलेले आहे. प्रत्येक प्राणीमात्रात देव पाहणारा आपला धर्म व संस्कृती म्हणूनच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही भारत देशातील विविध ठिकाणी फिरत आहोत. – साध्वी विष्णूप्रिया (धर्मशक्ती वेदांत गुरुकुलम मलेशिया)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!