केम मार्गे जाणारी भूम-अकलूज गाडी सुरू करण्याची मागणी

केम(संजय जाधव): पुर्वीची बंद असलेली भूम आगाराची भूम अकलूज गाडी सुरू करावी अशी मागणी करमाळा तालुका संपर्क प्रमुख सागर पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, पूर्वी भूम आगाराची गाडी भूम, माणकेश्वर,जवळा, परंडा आवाटी,सालसे साडे केम कंदर टेंभूणी मार्गे अकलूज एसटी सुर होती. ती केमला सकाळी ९:३० वा पोहचत होती. तसेच अकलूज येथून परत ३ वा दुपारी केमला पोहचत होती. हि एसटी भूम आगारात एक नंबरने चालत होती. परंतु केम येथे रेल्वे पुलाचे काम निघाल्याने सदरची गाडी कुर्डुवाडीमार्गे अकलूजला सोडण्यात आली. नंतर त्या गाडीला प्रतिसाद न मिळाल्याने हि गाडी बंद करण्यात आली. पुर्वी प्रमाणे ही एसटी भूम आगाराने सुरू केल्यास केम परिसरातील प्रवाशांना मराठवाडयाला जाण्यासाठी सोयीचे होणार आहे.
केम येथील पूर्वीसारखी व्यापाऱ्यांची आवक जावक चालू राहिल. केम परिसरातील पाहुणे रावळे भूम येथे आहेत त्यांना या गाडिमुळे सोय होणार आहे. तसेच माणकेश्वर,परांडा परिसरातील प्रवाशांना टेंभूणीं, इंदापूर,अकलूज जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असून त्यामुळे प्रवासी भाडे कमी लागणार आहे. केम येथील व्यापारी,प्रवाशांना टेंभुर्णी अकलूज जावे लागते. त्यांना पण ही गाडी सोयीची होणार आहे. सध्या केम कंदर मार्गे टेंभुर्णी हि दिवसात एकच गाडी आहे. त्या नंतर या मार्गावर दिवसभर एकही एसटी नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. तरी भूम आगाराने भूम अकलूज गाडी सुरू करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.




