करमाळा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह शिबिर संपन्न - Saptahik Sandesh

करमाळा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह शिबिर संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -करमाळा येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताह शिबिर संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे उपस्थित होते. यावेळी नागरिकांना संबोधित करताना घुगे म्हणाले की, लोकांनी वाहन चालवत असताना घ्यावयाची काळजी व लोकांकडून होणाऱ्या चुका याबद्दल मार्गदर्शन केले त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गावडे यांनी वाहन चालवत असताना दुचाकी,चार चाकी, त्याचबरोबर मोठ्या वाहनधारकांनी कोणत्या नियमाची अंमलबजावणी करावी ते उदाहरणासहित सांगितले त्याचबरोबर अपघातामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली.

यावेळी श्री गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहरातून बाईक रॅली काढली. रॅली मध्ये आरटीओ यांची गाडी पुढे त्यापाठीमागे मोटारसायकली आणि त्यांच्या पाठीमागे ड्रायविंग स्कुल च्या गाड्या होत्या. गाडयांना समाज जागृतीसाठी बॅनर लावलेले होते या कार्यक्रमाचे आयोजन ड्राईव्ह स्कूल असोसिएशन करमाळा यांनी केले. या मध्ये प्रामुख्याने साई ड्रायविंग स्कूल जेऊर,शौर्य ड्रायव्हिंग स्कूल व कृष्णा ड्रायव्हिंग स्कूल करमाळा त्याचबरोबर शिवरत्न बजाज जेऊर व कमलाई मोटर्स करमाळा यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला सूत्रसंचालन कमलाई मोटर्स चे श्री सतीश रुपनर यांनी केले. व आभार प्रदर्शन अक्षय पोमण साहेब यांनी केले

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सत्कार करताना परिवहन अधिकारी श्री. गावडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!