पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सागर पवार यांचा सत्कार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सरपडोह (ता.करमाळा) येथील सागर जयवंत पवार यांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार संपन्न झाला. सरपडोह गावांमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करणाऱ्या प्रत्येक यशवंताचा नागरी सत्कार करण्याची परंपरा आहे.त्याचप्रमाणे सरपडोह गावातून चौथा पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान सागर जयवंत पवार यांनी मिळवला त्याबद्दल सवाद्य मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर तालुक्यातील इतर सर्वच पोलिस निरीक्षक पदी निवड झालेल्या उमेदवारांना सत्कारासाठी आमंत्रित केले होते. त्यापैकी ओंकार दत्तात्रय धेंडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न झाला इतर उमेदवारांना काही कारणास्तव सत्कारासाठी उपस्थित राहता आले नाही.
सरपडोह गावातून जो विद्यार्थी लोकसेवा किंवा राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होईल त्यासाठी श्री काकासाहेब दत्तू भिताडे मेजर यांच्याकडून पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यानंतर श्री हनुमंत तुकाराम खरात साहेब व श्री जयवंत आण्णा पवार सर यांनीही प्रत्येक विद्यार्थ्यास पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. यापुढे गावातील जो विद्यार्थी लोकसेवा व राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होईल त्यास रोख पंधरा हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच मालनताई पांडुरंग वाळके, उपसरपंच नाथराव रंदवे, राष्ट्रीय मानवाधिकार राज्य संपर्कप्रमुख शामराव ननवरे गुरुजी, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता हनुमंत तुकाराम खरात, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन लक्ष्मण मारुती खराडे, अनिल माने सेक्रेटरी भाऊसाहेब, प्रकाश उत्तम ननवरे ओ सी सी आय संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष, अरूण चौगुले, सुनील भिमराव गायकवाड मेजर, गणेश मारुती घोगरे, संतोष आरणे महाराज, पोलिस पाटील
अंकूश गोरख खरात, ग्रामपंचायत सदस्य दत्ता मोरे, भानुदास शिंदे, बाळासाहेब गवारे तसेच विनायक आण्णा पवार, कालिदास भास्कर पाटील, शहाजी ढावरे, काकासाहेब भिताडे संघर्ष न्यूज चे पत्रकार सिद्धार्थ वाघमारे आयबीएन लोकमत पत्रकार हर्षवर्धन गाडे तसेच गावातील ग्रामस्थ, महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. खास करून परंडा तालुक्यातील मोठ्या संख्येने सागर पवार यांचे स्नेही व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश घोगरे तर सूत्रसंचालन नाथराव रंदवे व आभार प्रदर्शन अरूण चौगुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील सर्वच युवकांनी खूप परिश्रम घेतले.