राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत ‘संदेश पोळ’चे यश..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (एड्राव) (ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) यांच्यावतीने आयोजित इंजीनियरिंग कॉलेज विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तर पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत संगणक शास्त्र विषयात संदेश गजेंद्र पोळ (शेटफळ ता करमाळा जि. सोलापूर) यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज इचलकरंजी याने व्दितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
१ एप्रिल रोजी झालेल्या स्पर्धत राज्यातील व कोल्हापूर,सांगली सातारा जिल्ह्यातील इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता.इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत बहुतांश इंजीनियरिंग पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. संदेश हा पॉलिटेक्निकल डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत असूनही त्याने या स्पर्धेत भाग घेतला आहे, आर्टिफिशियल इंटेलेजन्स अँड डेटा सायन्स या विषयावर पेपर प्रेझेंट करून त्याने हे यश मिळवले आहे. त्याला डी.के.टी.कॉलेजच्या संगणकशास्त्र विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या यशाबद्दल डी.के.टी.कॉलेजचे प्राचार्य कोथळी सर संगणक शास्त्र विभाग प्रमुख रवी हातगीणे, वर्गशिक्षक एम जे.कळसे सर स्ट्रॉंमसॉफ्टचे अंकुश पोळ सर यांनी अभिनंदन केले आहे.