सालसे येथील कुस्ती आखाड्यात सानिका काळे विजयी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – काल (दि.२ एप्रिल) सालसे येथे फकिरबाबा यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. यात सालसे येथील सानिका संतोष काळे हिने संभाजी नगरची कुस्तीपटू शितल नेव्हारेला चितपट करत निर्विवाद यश संपादन केले. यानंतर कमिटीच्या व ग्रामस्थांच्या वतीने बक्षिसांचा वर्षाव करत एक लाख एक हजार रुपये रक्कम तिला बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले. सानिका ही सालसे येथील पहिलीच महिला कुस्तीपटू आहे.
सानिका ही त्रिमूर्ती कुस्ती संकुल नेवासा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून तिने यापूर्वीही क्रीडा संकुलाचे व सोलापूर जिल्ह्याचे नाव कुस्ती क्षेत्रात लौकिक केले आहे. सानिकाच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


