उणिवांवर भाष्य करण हेच पत्रकाराचे काम : संजय आवटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.२१) : व्यवस्थेतील उणिव शोधून समाजासमोर दाखवणे, हेच पत्रकारांचे काम आहे, व्यवस्थेचे कौतुक करणे ही पत्रकारीता नाही तर समाजातील प्रश्न शोधणे व त्याचा पाठपुरावा करणे महत्वाचे आहे. तालुक्यातील तहसील कार्यालये, पंचायत समिती, आरोग्य केंद्र या आदी कार्यालयांवर अख्खा पेपर चालु शकतो. यासाठी पत्रकारांनी समस्या शोधुन त्याचा पाठपुरावा केले पाहीजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने आज (२१) एकदिवसीय पत्रकार कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी उद्घाटक म्हणून श्री. आवटे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर दैनिक नवशक्तीचे समूह सहपादक राजा माने, पिपंरी चिंचवडचे निवासी संपादक जयंत जाधव, स्वातंत्र सैनिक जेष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार डॉ.ॲड.बाबुराव हिरडे, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, शिवसेना महिला आघाडीच्या आरतीताई बसवंत, डॉ.कोमल शिर्के, ॲड.शिरिष लोणकर, संतोष वारे, हनुमंत मांढरे, प्रतापराव जगताप, दादासाहेब थोरात आदि जण उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.आवटे म्हणाले की, आपण विचार करायला शिकलं पाहिजे व वाचकाला विचार करायला भाग पाडल पाडले पाहिजे, प्रस्तापितांच्या बरोबर राहुन समस्या समजत नसतात, त्यांच्या समोर राहून परखड पणे सामांन्याचे प्रश्न मांडले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने, मुख्यमंत्री सहाय्याता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पिंपरी चिंचवड सकाळ आवृत्तीचे निवासी संपादक जयंत जाधव यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी पत्रकार संघातर्फे आदर्श पत्रकारितेचे पाच पुरस्कार जाहीर केले. शेखर स्वामी, होमगार्डचे तालुका समादेशक सचिन जव्हेरे, विशाल परदेशी, शितलकुमार मोटे, सिध्दार्थ वाघमारे यांना हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले शाल, फेटा, फ्रेम व धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
दुपारच्या सत्रात पत्रकार व ‘बदनामीचा कायदा’ या विषयावर डॉ.ॲड. बाबुराव हिरडे यांचे भाषण झाले तसेच ‘पत्रकारीतेतील आव्हाने’ या विषयावर संपादक जयंत जाधव यांचे भाषण झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी केले. तर सुत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोरकुमार शिंदे यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार नाशीरभाई कबीर, अशोक नरसाळे, अशपाक सय्यद, सुनील सूर्यपुजारी, अविनाश जोशी, सचिन जव्हेरी, विशाल परदेशी, नागेश चेंडगे आदींनी केले. यावेळी कुर्डुवाडीचे ज्येष्ठ पत्रकार विनायक दिक्षित, मोंडनीबचे पत्रकार मारुती वाघ यांची भाषणे झाली. यानंतर कार्यशाळेच्या शेवटी प्रविण अवचर यांच्या गीताने समारोप करण्यात आले.