करमाळा आगारातील वरीष्ठ लिपिक संजय माने यांचे निधन

संजय बाबा माने

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : येथील आगारातील वरीष्ठ लिपिक संजय बाबा माने (वय ५१ ) यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे. –

स्व. माने यांना मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्याने शुक्रवारी (दि.१५) सोलापूर येथील काटीकर हॉस्पिटलला उपचारासाठी नेले होते. उपचार चालू असतानाच आज दुपारी साडेतीन वाजता दवाखान्यातच त्यांचे निधन झाले आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वीच त्यांच्या एका मुलाचे निधन झाले होते. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. नगरपालिकेतील बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बाबा माने यांचे ते चिरंजीव होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!